मोबाईल चोरी प्रकरणातील दोन चोरटे अटकेत; १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी –
शहापुर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाच्या कारवाईत मोबाईल चोरी प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले ५ मोबाईल हँडसेट व ३ मोटारसायकली असा एकूण ₹१,२६,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ३० जून २०२५ रोजी सुमारे ३.३० वाजता गणेशनगर गल्ली नं. ९ येथील शुभम पाटील यांच्या यंत्रमाग कारखान्यातील कामगारांच्या निवासस्थानात चोरीची घटना घडली होती. आरोपींनी खिडकीतून हात घालून दरवाजाची कडी उघडून खोलीत प्रवेश केला व उशाजवळ ठेवलेला मोबाईल चोरून नेला.
या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शोध पथकास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ₹४१,०००/- किमतीचे ५ अँड्रॉईड मोबाईल हँडसेट, तसेच ₹८५,०००/- किमतीच्या हिरो होंडा कंपनीच्या २ मोटरसायकली व टीव्हीएस ज्युपिटर मोपेड असा एकूण तीन मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या.
याप्रकरणी हर्षवर्धन शिवकांत काटे (वय १९), रा. गणेशनगर, गल्ली नं. ४, शहापुर.व बबलू उमाजी जुवे (वय २२), रा. गोलघुमट, लोकमान्य नगर, कोरोची यांना अटक करण्यात आली आहे.
वरील कारवाई कोल्हापूर पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक (गड विभाग) श्री. अण्णासाहेब जाधव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापुर पोलीस निरीक्षक श्री. सचिन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे, आयुब गडकरी, रोहित डावाळे, अर्जुन फातले, शशिकांत ढोणे व येवाजी चळचुक यांनी सहभाग
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







