बदललेले नळे ४ महिन्यापासून एका ठिकाणीच,आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली
बघा व्हिडीओ
https://youtube.com/shorts/XP8clKQ2Hjk?si=IsKak7wHEgn3RqZW
इचलकरंजी:
इंडस्ट्रीयल इस्टेट येथील भुवनेश्वरी देवी मंदिराजवळ धीरज माळी यांच्या घरासमोर ४ महिन्यांपूर्वी गटारीचे काम करण्यात आले,तेथील मोठे नळे बदलून मक्तेदाराने ते तसेच सार्वजनिक रस्त्यावर तसेच ठेवले याबाबत माळी यांनी ६ मार्च ला लेखी पत्राने महापालिका प्रशासनास साहित्य उचलून नेण्याबाबत व स्वच्छतेबाबत कळवले
झोपलेल्या महापालिका प्रशासनाने काहीच न केल्याने त्यांनी १३ मे रोजी आयुक्त पल्लवी पाटील यांची समक्ष भेट घेतली व वस्तुस्थिती आणि होणारा त्रास समजावून सांगत स्मरणपत्र ही दिले. आयुक्तांनी आपल्या धडाकेबाज स्टाईल ने तातडीने संबंधिताना काम पुर्ण करण्याचे आदेश दिले त्यानंतर पावणे दोन महिने झाले तरी कोणीही फिरकले नाही..
आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणारे अधिकारी कोण त्यांच्यावर कारवाई होणार का? स्वच्छतेचा पुरस्कार मिळवणाऱ्या महापालिकेकडून संबंधित ठिकाणचे नळे उचलून सफाई होणार का?असा प्रश्न तक्रारदारास पडला आहे..
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







