आषाढी एकादशी निमित्त बालचमुंशी संवाद व खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न,
श्री योगेश्वरी प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम
इचलकरंजी:
आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री योगेश्वरी प्रतिष्ठान बहुउद्देशीय इचलकरंजीच्या वतीने ब्राह्मण सभा संचलित जिजीबाई शिशु वर्ग व संस्कार केंद्र येथे बालचमुंशी संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमात लहान मुलांना खाऊ वाटप करून एक आनंददायी वातावरण निर्माण करण्यात आले.
कार्यक्रमात प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनीष आपटे, खजिनदार संजय पुजारी, ब्राह्मण सभा इचलकरंजीचे सचिव संजय मैंदर्गी, उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, रंगयात्रीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद दांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिशु संस्कार वर्गाच्या शिक्षिका सौ. सुमन लेले, सौ. मिनाक्षी जोशी, सौ. सारिका सटाले, सौ. ज्योती सोमण, सौ. मिरा जगताप, श्रीमती उज्वला गाताडे आणि सौ. पुनम यादव यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
Advt
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष मनीष आपटे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. मिलिंद दांडेकर यांनी केले. या उपक्रमास श्री योगेश्वरी प्रतिष्ठान इचलकरंजीचे सर्व संचालक व हितचिंतक यांचे विशेष सहकार्य लाभले.
खाऊ वितरण करताना मनीष आपटे व सहकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







