कराओके गीत गायन स्पर्धेत मुकूंद दिक्षित प्रथम
इचलकरंजी
सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वरांश गीत संगीत शाहिरी संस्थेच्या वतीने आयोजित हौशी व नवोदित कलाकारांच्या कराओके गीत गायन स्पर्धेत मुकुंद दीक्षित (सांगली) यांनी प्रथम, चिराग बलदवा (इचलकरंजी) यांनी द्वितीय तर गौरी शिंदे (कोल्हापूर) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. यावेळी दादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शाहिर संजय जाधव लिखित आवाडे दादांचे जीवन कार्य गौरव पोवाडारुपी पुस्तकाचे प्रकाशन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिनी पंडित बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळ येथे ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचा शुभारंभ प्रकाश दत्तवाडे, प्रसाद कुलकर्णी, नंदू पाटील, शाहीर हिंदुराव लोंढे, परीक्षक रश्मी सावंत, राजवर्धन तगारे, केतकी पाटील या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आला. या स्पर्धेत अनेक हौशी व नवोदित कलाकार सहभागी झाले होते. त्यामध्ये मुकुंद दीक्षित, चिराग बलदवा, गौरी शिंदे यांनी अनुक्रमे क्रमांक मिळविला. तर चेतना किनेकर, सुरज रवंदे, प्रज्ञा सावंत, वसीम मुजावर,दीपक काळे,कोमल बाळेकुंद्री,अपूर्वा जावळे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. विजेत्या स्पर्धकांना अहमद मुजावर, परीक्षक रश्मी सावंत, राजवर्धन तगारे यांच्या हस्ते बक्षिस व दादांचे पुस्तक देण्यात आले.
Advt
सर्व सहभागी स्पर्धकांना अॅड. बाबासाहेब निकम, शिवाजी लोहार, अतुल पाटील सर, केतकी पाटील, धोंडीराम पाटील, सौ. सीमा मुळे, प्रविण केसरकर यांचे हस्ते सर्टीफिकेट देण्यात आली. सूत्रसंचलन सीमा मुळे यांनी केले. आभार केतकी पाटील यांनी मानले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








