मध्यस्थी जागरुकतेसाठी इचलकरंजीत विशेष मोहिमेची सुरुवात
इचलकरंजी:
दि इचलकरंजी बार असोसिएशन व हातकणंगले तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने “मेडिएशन अवेअरनेस – मेडिएशन फॉर द नेशन” या मध्यस्थी जागरुकता मोहिमेचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात करण्यात आला. कार्यक्रमात मा. सर्वोच्च न्यायालय, मा. उच्च न्यायालय व मा. जिल्हा न्यायालयातील मान्यवर न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाचा लाभ सहभागी वकिल व न्यायाधीशांना मिळाला.
Advt
मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. बी. अग्रवाल मॅडम, मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. एल. गांधी, मा. न्यायाधीश एम. ए. भोसले, जी. एम. नदाफ, पी. एन. रोकडे, व आर. डी. खराटे मॅडम यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
कार्यक्रमात मा. जे. एल. गांधी साहेब यांनी “मध्यस्थी ही भविष्यातील न्याय प्रणालीची गरज असून, अधिकाधिक प्रकरणे न्यायालयाच्या बाहेर संवादातून आणि सामंजस्यातून सोडवली गेली पाहिजेत” असे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, सन २०१४ पासून त्यांनी सुमारे ५००हून अधिक वकिलांना आणि ३००हून अधिक न्यायाधीशांना मध्यस्थी प्रशिक्षण दिले असून, यामुळे न्यायदान प्रक्रियेतील विलंब टाळता येतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला प्रतिनिधी अॅड. दिपाली हणबर यांनी केले. यावेळी आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँकेचे संचालक म्हणून नियुक्त झाल्याबद्दल सिनिअर अॅड. अरविंद खानविलकर यांचा गौरव मा. गांधी साहेबांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोर्ट मॅनेजर एस. एस. खाडे मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष अॅड. राजाराम सुतार, सेक्रेटरी अॅड. अभिजीत माने, जॉ. सेक्रेटरी अॅड. आदित्य मुदगल, खजिनदार अॅड. विजय शिंगारे, महिला प्रतिनिधी अॅड. दिपाली हणबर, कार्यकारिणी सदस्य अॅड. महेश कांबळे, अॅड. राहुल काटकर, अॅड. शैलेंद्र रजपूत, विधी सेवा समितीचे श्री. ज्ञानेश्वर मिरजकर, प्रवीण फगरे यांच्यासह बार असोसिएशनचे सर्व सदस्य आणि न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता करताना संयोजकांनी अशा जनजागृती उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







