पावसाचे पाणी साचते दारात; कर भरूनसुद्धा नागरिकांना त्रास!
बघा व्हिडीओ
https://youtube.com/shorts/FnaeOqzk6mk?si=okpWX2iT6o0KKAJN
इचलकरंजी :
वैरण बाजारातील अनीश हॉस्पिटलसमोरील श्री कृष्णा कॉम्प्लेक्स परिसरातील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. मर्दा प्रोसेसच्या पुढील बाजूस असलेल्या या भागात पावसाचे पाणी साचून राहते. त्यामुळे पावसात नागरिकांना चिखलात व पाण्यातून वाट काढावी लागते.
नाले सफाई, पावसाळी पूर्वतयारी, रस्ते दुरुस्ती यासाठी नगरपालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. पण प्रत्यक्षात नागरिकांच्या समस्या जशाच्या तशाच राहतात. कर वेळेवर भरूनसुद्धा नागरिकांना अशा मूलभूत सुविधांसाठी त्रास सहन करावा लागत आहे, ही बाब मनपाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
“श्री कृष्णा कॉम्प्लेक्ससमोर काही फुटांवर पाणी साचते. वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. पावसात दाराबाहेर उभं राहणंही कठीण जातं,” अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
या गंभीर समस्येकडे महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, योग्य पाणी निचरा व्यवस्था करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. अन्यथा नागरिकांचा रोष उफाळून येणार, हे निश्चित आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







