ICHMH51NEWS.IN
9921600800

सनातन संस्थेच्या वतीने सांगली जिल्ह्यात ५ ठिकाणी  ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन !

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सनातन संस्थेच्या वतीने सांगली जिल्ह्यात ५ ठिकाणी  ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन !

सांगली –

हिंदु धर्मातील अद्वितीय आणि श्रेष्ठ परंपरा म्हणजे गुरु-शिष्य परंपरा! गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे; परंतु आजचे युग हे धर्मयुद्धाचे आहे. संपूर्ण पृथ्वीवर अधर्माचे सावट पसरले आहे. अशा काळात धर्माच्या बाजूने उभे राहणे, हाच साधनेचा आणि मुक्तीचाही सर्वोच्च मार्ग आहे. ही जाणीव प्रत्येकापर्यंत पोचवण्यासाठी आणि धर्म-राष्ट्रासाठी कर्तव्यनिष्ठा जागवण्यासाठी गुरुवार, १० जुलै २०२५ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हा महोत्सव मराठी, हिंदी, गुजराती,  तमिळ, तेलुगु, मल्याळम्, बंगाली आदी भाषांमध्ये देशभरात ७७ ठिकाणी, तर सांगली जिल्ह्यात ५ ठिकाणी  ठिकाणी होणार आहे. सांगली-विश्रामबाग येथील गुरुपौर्णिमा खरे मंगल कार्यालय येथे सायंकाळी ५ वाजता, मिरज येथील गुरुपौर्णिमा आळतेकर हॉल, ब्राह्मणपुरी येथे सायंकाळी ५ वाजता, तर तासगाव येथील गुरुपौर्णिमा श्रीराम मंगल कार्यालय येथे दुपारी ३ वाजता, कवठेमहांकाळ येथे श्रीराम मंगल कार्यालय, सिद्धनाथ मल्टीपर्पज हॉलशेजारी, देशिंग रोड येथे दुपारी ४ वाजता, तर पलूस येथील गुरुपौर्णिमा महोत्सव श्री मंगल कार्यालय, जुन्या बसस्थानकाच्या मागे सायंकाळी ५ वाजता होणार आहे. तरी सर्व राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सहकुटुंब या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेने केले आहे.
Advt


या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन), सनातन राष्ट्र शंखनाद सोहळ्याचा प्रेरणादायी व्हिडिओ प्रक्षेपण; रामराज्य स्थापनेसाठी संकल्प आणि सामूहिक नामजपयज्ञ; समाज, राष्ट्र आणि धर्म विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन; तसेच ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. याव्यतिरिक्त धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विषयांवरील ग्रंथप्रदर्शन आणि राष्ट्र-धर्म विषयक फलक प्रदर्शनही महोत्सवस्थळी लावण्यात येणार आहे. तरी अशा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ – देश-विदेशांतील भाविकांना गुरुपौर्णिमेचा लाभ मिळावा यासाठी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ व मल्याळम् भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. १० जुलैला मराठी भाषेतील महोत्सवाचा लाभ पुढील लिंकवरून घेता येईल : Sanatan.org/mr/ Gurupurnima

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा