ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी शहर खड्डेमुक्त करण्यासाठी आपचे निवेदन त्वरित उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी शहर खड्डेमुक्त करण्यासाठी आपचे निवेदन, त्वरित उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

इचलकरंजी –
इचलकरंजी शहरातील रस्त्यांची दुरवस्था, पावसामुळे जागोजागी पडलेले खड्डे, व त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे वाढते प्रमाण या पार्श्वभूमीवर ‘आम आदमी पार्टी’च्यावतीने आज उपायुक्त मा.रोशनी गोडे  यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.

या निवेदनात शहरातील अनेक भागांमध्ये साचणारे पाणी, निकृष्ट दर्जाचे रस्ते, आणि खड्ड्यांमुळे सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासावर प्रकाश टाकण्यात आला. विशेष म्हणजे, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष वसंत कोरवी यांनी याबाबतचे ठोस पुरावे सादर करत प्रशासनाकडून तात्काळ खड्डेमुक्त मोहिम राबवण्याची मागणी केली.

“जर लवकरात लवकर कारवाई केली नाही, तर आम आदमी पार्टीकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.

यावेळी शहराध्यक्ष वसंत कोरवी यांच्यासह, उपाध्यक्ष यशवंत भंडारेप्रकाश सुताररावसो पाटील, आणि बाबुराव माळी हे पदाधिकारी उपस्थित होते.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा