इचलकरंजी न्यायालय परिसर अस्वच्छतेच्या गर्तेत – स्वच्छताप्रश्नी वकिलांवर अन्यायाची नामुष्की.
बघा व्हिडीओ
https://youtube.com/shorts/FPuFgPYCShc?si=tceiq3KqEdMinM6M
इचलकरंजी, –
सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या वकिलांना स्वतः मात्र अस्वच्छतेच्या अडचणीतून वाट काढावी लागत आहे. इचलकरंजी येथील न्यायालय परिसर सध्या कचऱ्याचे ढीग, मातीचे ढिगारे आणि दुर्गंधी यामुळे गंभीर अस्वच्छतेच्या समस्येला सामोरे जात आहे.
न्यायालय परिसरात दररोज अनेक नागरिक विविध कामांसाठी ये-जा करत असताना परिसरातील अस्वच्छता प्रशासनाच्या दुर्लक्षाचे निदर्शक ठरते. पावसाळ्यामुळे रस्त्यावर चिखल व सांडपाणी साचून वकिलांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
याबाबत वेळोवेळी स्वच्छतेबाबत तक्रारी करूनही महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. न्यायाच्या मंदिरात काम करणाऱ्या वकिलांवर ही अस्वच्छतेची नामुष्की अन्यायकारक असल्याची भावना वकिलांमध्ये आहे.
महापालिकेने तात्काळ लक्ष घालून न्यायालय परिसराची नियमित साफसफाई करावी आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी न्यायालयाशी संबंधित सर्वच घटकांतून होत आहे. वकिलांनी न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







