ICHMH51NEWS.IN
9921600800

सोशल मिडियावर समाजप्रबोधन करणाऱ्यांना पुरस्कार पत्रलेखक संघटनेच्या बैठकीत निर्णय; २८ वा वर्धापन दिन २१ सप्टेंबरला होणार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सोशल मिडियावर समाजप्रबोधन करणाऱ्यांना पुरस्कार,पत्रलेखक संघटनेच्या बैठकीत निर्णय; २८ वा वर्धापन दिन २१ सप्टेंबरला होणार

इचलकरंजी
वृत्तपत्र पत्रलेखक संघटनेची महत्वपूर्ण बैठक नुकतीच समाजवादी प्रबोधिनी, इंडस्ट्रियल इस्टेट येथे पार पडली.या बैठकीत संघटनेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला आणि आगामी २८ वा वर्धापनदिन २१ सप्टेंबर २०२५ रोजी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यंदाचा वर्धापन दिन विशेष ठरणार आहे. सध्या समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रभावाचा विचार करून, संघटनेतर्फे समाजप्रबोधन व जनजागृतीसाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर करणाऱ्या तीन व्यक्तींना ‘जनजागृती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून सामाजिक समस्या, नागरी प्रश्न,जनहिताचे मुद्दे सातत्याने मांडून परिवर्तन घडवणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्याचा उद्देश संघटनेचा आहे.
पुरस्कारासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अशा व्यक्तींनी किंवा संस्थांनी आपले कार्य व योगदान यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत समाजवादी प्रबोधिनी, इंडस्ट्रियल इस्टेट, इचलकरंजी जि.कोल्हापूर येथे पाठवावेत,असे आवाहन संघटनेने केले आहे.
Advt
प्रस्ताव पाठवताना कार्याची माहिती, उपक्रमाचे स्वरूप, सोशल मिडियावरील योगदान आणि त्याचा सामाजिक परिणाम याबाबत स्पष्ट माहिती द्यावी, असेही सूचित करण्यात आले आहे.
सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
अधिक माहितीसाठी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पिसे (मो. 9921524098) व अभिजित पटवा (9921600800) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर बैठकीस ज्येष्ठ मार्गदर्शक प्रसाद कुलकर्णी,अध्यक्ष पांडुरंग पिसे,सचिव मनोहर जोशी,महेंद्र जाधव,दिपक पंडित,अभिजित पटवा व पत्रलेखक उपस्थित होते
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा