ICHMH51NEWS.IN
9921600800

कोल्हापुरात गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न – १२०० जिज्ञासूंची उत्स्फूर्त उपस्थिती

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोल्हापुरात गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न – १२०० जिज्ञासूंची उत्स्फूर्त उपस्थिती

कोल्हापूर

कोल्हापूर शहरातील इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन येथे १० जुलै २०२५ रोजी सनातन संस्थेच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवाला सुमारे १,२०० जिज्ञासूंनी उपस्थिती लावली. प्रारंभी श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरुपूजन, ग्रंथप्रकाशन, सामूहिक नामजपयज्ञ व प्रेरणादायी व्याख्याने झाली.

Advt

 

प्रवक्ता. अभय वर्तक यांनी राष्ट्र-धर्म रक्षणासाठी अधिकाधिक वेळ समर्पित करण्याचे आवाहन करताना भारतावरील अंतर्गत व बाह्य संकटांचा आढावा घेतला. तर लेखक श्री. अभिजित जोग यांनी गुरुपरंपरेच्या रक्षणातून भारतीय संस्कृतीचे संरक्षण शक्य असल्याचे सांगितले.

या महोत्सवात विविध धर्मग्रंथ व शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, ग्रंथप्रदर्शन, फलक, आणि ‘साधनेचे मौलिक दृष्टीकोन’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले. महोत्सवात अनेक हिंदुत्वनिष्ठ मान्यवर, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी सहभागी झाले होते.

ऑनलाइन महोत्सवांचा लाभ देश-विदेशांतील हजारो भाविकांनी घेतला.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा