पोस्ट कर्मचाऱ्यावर सरकारी निधी अपहाराचा गुन्हा दाखल
इचलकरंजी
चंदूर पोस्ट ऑफिसमधील शाखा डाकपालाने सरकारी निधीचा २४,५००/- अपहार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अशोक तातोबा कांबळे (रा. चंदूर, ता. हातकणंगले) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रेमसिंह हायातसिंह धर्मशक्तु (वय ५५) हे इचलकरंजी उप विभागात सहाय्यक अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जानेवारी २०२१ ते ९ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत आरोपीने चंदूर पोस्ट ऑफिसमध्ये सामान्य नागरिकांनी बचत खाते, आवर्ती खाते व सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत केलेली एकूण ₹२४,५००/- रक्कम शासकीय हिशोबात न घेता अप्रामाणिकपणे स्वतःसाठी वापरली.
Advt
या प्रकरणी पोस्ट खात्याचा आणि खातेदारांचा विश्वासघात केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे,सदर गुन्ह्याचा तपास पो.हे.कॉ. इंदूलकर करत आहेत
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







