(MRDP) अंतर्गत महानगरपालिका, मित्रा आणि भागधारक यांचे समवेत सल्लामसलत बैठक संपन्न,इचलकरंजी शहरात पुर नियंत्रण व आपत्ती निवारणासाठी उपाययोजना राबवणार -आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील.
इचलकरंजी
इचलकरंजी शहरात सन २०१९ आणि २०२१ या साली पंचगंगा नदीस आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात वित्त हाणी झालेली होती. या अनुषंगाने संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेसाठी जागतिक बँकेमार्फत तसेच राज्य शासन निधी उपलब्ध करून देणार असून सदर निधी महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (MRDP) प्रकल्पांतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या अनुषंगाने मित्रा संस्थेचे जॉईंट सि. ई. ओ. श्री . अमन मित्तल व्हि.सी. व्दारे, आमदार डॉ.राहुल आवाडे आणि आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील , यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रकल्पाशी संबंधित भागधारक यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय/ निमशासकीय विभाग, . , शहरातील पुर क्षेत्रातील लोकप्रतिनिधी यांचे समवेत सल्लामसलत बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते.
बैठकीच्या प्रारंभी अति . आयुक्त सुषमा शिंदे यांनी महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (MRDP) प्रकल्पांतर्गत माहिती दिली . शाह कन्सल्टन्सी चे अनिल कोकणे यांनी पीपीटीच्या माध्यमातून स्लाईडशोद्वारे सादरीकरण केले.
इचलकरंजीसह कोल्हापूर आणि सांगली याठिकाणी निर्माण होत असलेल्या पुरपरिस्थितीच्या अनुषंगाने विशेष उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. जागतिक बँकेच्या सहकार्याने दोन्ही जिल्ह्यांत उद्भवनाऱ्या पूर परिस्थितीच्या नियंत्रणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे नियोजन करणेत येणार आहे. यामध्ये नद्यांचे व्यवस्थापन, जलसाठ्याची शास्त्रशुद्ध पुनर्रचना, आणि जलप्रवाह नियंत्रण यांसारख्या आधुनिक उपाययोजना समाविष्ट आहेत.
Advt
या प्रकल्पा अंतर्गत पूर नियंत्रणासोबतच दुष्काळ व्यवस्थापन, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, आणि स्थानिक पातळीवर क्षमता विकासा यावरही भर देण्यात येणार आहे. स्थानिक यंत्रणांना पूराचा सामना करण्यासाठी प्रशिक्षण, आधुनिक साधने, व तांत्रिक सहाय्य पुरवले जाणार आहे.
या बैठकीत आमदार डॉ . राहुल आवाडे यांनी पूर परिस्थिती निर्माण होवू नये या कामी उपायोजना सूचविल्या तसेच उपस्थितांना मार्गदर्शन व शंकानिरसण केले .प्रकल्पाविषयी लवकरात लवकर अमंलबजावणी करावी याबाबत सूचना दिल्या . इचलकरंजी शहरासह कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी उपाययोजना राबवण्यास प्रकल्पाअंतर्गत समावेश आहे.
मागील काही वर्षांत आलेल्या महापुराचा परिणाम इचलकरंजी सह नजीकच्या चंदुर या गावावर सुद्धा होतो. याकरिता चंदुर ते तेरवाड बंधारा पंचगंगा नदीची खोली वाढविण्यासाठी गाळ माती काढण्यासाठी आवश्यक सर्व मान्यतेनंतर याची अंमलबजावणी करण्यासाठी सुचना यावेळी दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, मित्राचे विनय कुलकर्णी व्हि.सी द्वारे, उपायुक्त अशोक कुंभार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, सहा.आयुक्त विद्या कदम, रोशनी गोडे, विजय राजापूरे ,स्मिता माने कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग कोल्हापूर , कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम रोहित तोंदले, जागतिक बँकेचे प्रतिनिधी, मित्राचे प्रतिनिधी रितु वैष्णव, मैत्रेयी अरवारी, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, अमृत भोसले, रवी लोहार, इकबाल कलावंत, नागेश पाटील, प्रमोद बचाटे राहुल घाट इत्यादी सह पुर क्षेत्रातील रहिवासी त्याचबरोबर शहरातील बांधकाम व्यावसायिक प्रतिनिधी यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भात सविस्तर चर्चा करुन प्रकल्पाच्या अनुषंगाने विविध सुचना दिल्या.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







