इचलकरंजीत बार कर्मचाऱ्यावर मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा
इचलकरंजी
इचलकरंजीतील सिग्नेचर हॉटेल व बारमध्ये बिअर न दिल्याच्या कारणावरून चौघांनी बारमध्ये काम करणाऱ्या युवराज जामणेकर (वय ३५) याला मारहाण केली. १० जुलै रोजी रात्री ११.३० वाजता झालेल्या या प्रकारात आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ व धमकी दिली. कल्पेश भंडारी, अक्षय शिंदे व अनिकेत शिंदे व मुझ्झमिल कर्नाजी अशी आरोपींची नावे असून, त्यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.ना. कांबळे करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







