अवैध दारू साठ्यावर शिवाजीनगर पोलिसांची कारवाई.
इचलकरंजी
इचलकरंजी दातार मळा येथील चिंचेच्या झाडाखाली उघड्यावर बेकायदेशीर देशी दारू साठवून ठेवलेल्या प्रकरणी सुनिता धोंडीराम वरुडे (वय ५२) या महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत १८ लिटर तयार देशी दारू, डॉ. जी.एम. कंपनीच्या ९० मि.ली.च्या १२ बाटल्या आणि काचेचा ग्लास असा २२२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.गुन्हा विक्री हेतूने दारू बाळगल्याप्रकरणी दाखल करण्यात आला असून तपास सहा. फौजदार कसेकर करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







