सील केलेला प्लॉट ताब्यावरून वाद, महिला व अन्य ६ जणांविरोधात गुन्हा
इचलकरंजी
इचलकरंजीत मिळकतीवर बेकायदेशीर ताबा घेतल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रजिया बेगम नैइमहम्द मुल्ला व सहा अनोळखी गाळेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रविण देसाई (रा. कोल्हापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३ जुलै २०२५ रोजी पहाटे कबनूर येथील प्लॉट क्र. १ वर आरोपींनी कोर्टाच्या आदेशाचा भंग करत कुलूप व सिल तोडून बेकायदेशीर ताबा घेतला. तसेच, “आम्ही इथेच राहणार, तुम्हाला काय करायचं ते करा” अशी धमकीही दिली. विविध कलमानुसार गुन्हा दाखल असून तपास सहा. फौजदार अबिटकर करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







