बेकायदेशीर दारूसाठा जप्त एकावर कारवाई
इचलकरंजी :
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने १४ जुलै रोजी रात्री ८.२५ वाजता पंचवटी टॉकीजसमोर आरेकर गल्लीत कारवाई करत संजय प्रकाश नगरकर (वय ५३, रा. शांतीनगर) याच्याकडून गावठी हातभट्टीची १४ लिटर दारू व ११ विदेशी प्लास्टिक बाटल्या असा एकूण १७८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. काही प्रमाणात नमुने घेऊन उर्वरित दारू जागीच नष्ट करण्यात आली. सुकुमार कृष्णा बरगाले (पो.कॉ. २३७५) यांनी फिर्याद दिली असून आरोपीने दारू विक्रीसाठी बेकायदेशीररित्या साठा केल्याचे निष्पन्न झाले. तपास सहायक फौजदार रावसाहेब कसेकर करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







