इचलकरंजीतील पाणीटंचाईवर उपाययोजना व्हावी – उमाकांत दाभोळे यांची महानगरपालिकेकडे मागणी
इचलकरंजी :
शहरात दररोज पाणीटंचाई जाणवत असून, पाणीपुरवठा विभागाकडून ३ ते ५ दिवसातून एकदा कमी दाबाने पाणी पुरवले जात आहे. कृष्णा (३६ एमएलडी) आणि पंचगंगा (९ एमएलडी) योजनांमधून पुरेसा पाणी उपसा होत असूनही वितरणात गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपा उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी इचलकरंजी महानगरपालिका आयुक्तांकडे जलपरिक्षण (वॉटर ऑडीट) तातडीने करण्याची मागणी केली आहे. तसेच वितरणातील गळती थांबवण्यासाठी स्कॉडा बटरफ्लाय व्हॉल्वसारखी आधुनिक यंत्रणा बसवावी, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. या निवेदनाची प्रत खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. राहुल आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनाही देण्यात आली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







