इचलकरंजीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी भूखंड देण्याबाबत १७ जुलै रोजी बैठक-आ.राहुल आवाडे
मुंबई : इचलकरंजी येथे नव्याने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्यासाठी आवश्यक भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, १७ जुलै २०२५ रोजी दुपारी १ वाजता विधानभवन, मुंबई येथील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आ.राहुल आवाडे यांनी दिली आहे.
इचलकरंजी शहरासाठी स्वतंत्र व सुसज्ज असे MH51 कार्यालय व्हावे यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस आमदार डॉ. राहुल आवाडे, परिवहन आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या तयारीसाठी संबंधित विभागांना सूचनाही दिल्या असून, सात दिवसांत कार्यवृत्त सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







