इनामने केली घरफाळा सवलतीच्या मुदतवाढीची मागणी
इचलकरंजी :
महानगरपालिकेच्या घरफाळा सवलत योजनेची अंतिम तारीख १५ जुलै असून,अनेक भागात घरफाळा बिले वेळेत न मिळाल्याच्या तक्रारी आहेत. १४ जुलै २०२५ अखेर केवळ ५,५३२ मिळकतधारकांनी सवलतीचा लाभ घेतला असून ही संख्या एकूण मिळकतीच्या फक्त १० टक्के आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना सवलतीचा लाभ घेता यावा यासाठी इचलकरंजी नागरिक मंचने दुसऱ्या सहामाहीच्या संयुक्त करात १० टक्के सवलती योजनेस एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







