ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत काँग्रेसतर्फे जनसुरक्षा कायद्याची होळी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत काँग्रेसतर्फे जनसुरक्षा कायद्याची होळी

इचलकरंजी:

महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेल्या जनसुरक्षा कायदा २०२४ च्या विरोधात इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. या निदर्शनादरम्यान शहरातील मुख्य चौकात या कायद्याची प्रतिकात्मक होळी करण्यात आली.

Advt

या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर यांनी जनसुरक्षा कायद्याचे तपशीलवार विवेचन करताना, हा कायदा लोकशाहीला गालबोट लावणारा असून नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचा आरोप केला. त्यांनी राज्य शासनावर लोकशाही विरोधी धोरणे राबवण्याचा आरोप केला.

शहर काँग्रेस अध्यक्ष संजय कांबळे यांनीही आपल्या भाषणात सरकारचा तीव्र निषेध नोंदवला व जनतेने या कायद्याच्या विरोधात एकत्र यावे असे आवाहन केले.

या आंदोलनात बाबासाहेब कोतवाल, शशिकांत देसाई, प्रमोद खुडे, युवराज शिंगाडे, अजित मिणेकर, रवींद्र पाटील, प्रशांत लोले, ताहीर खलिफा, योगेश कांबळे, अण्णा कांबळे, तौसिफ लाटकर, रवी वासुदेव, सुदाम साळुंखे, प्रमोद नेजे, ओंकार आवळकर, दशरथ जावळे, राजु किणेकर, प्रवीण फगरे, शिवाजी चव्हाण, बिस्मिल्ला गैबान, वेदिका कळंत्रे, चंद्रकांत लोकरे, हिदायत आत्तार, रोहित जावळे, राजु ब्बनावर, रवी नवाळे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.काँग्रेसने हा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी करत राज्यभर जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

फोटो-

निदर्शने करताना काँग्रेसचे पदाधिकारी

कायद्याची होळी करताना काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा