इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील किसनराव आवळे मैदान येथील त्यांच्या अर्धपुतळ्यास महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी सहा आयुक्त. विद्या कदम, सहा.आयुक्त रोशनी गोडे, माजी नगरसेवक अब्राहम आवळे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, संदिप जोशी, प्रदीप झमरी, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे, स्वच्छता निरीक्षक विनोद जाधव, संग्राम भोरे, अशोक कमते, महेश बुचडे, सुरेश होनुले, नवनाथ बंडगे, मंजुनाथ खंदारे, दिलीप मगदुम, विनायक कांबळे यांचेसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करताना आयुक्त पल्लवी पाटील,अति आयुक्त सुषमा शिंदे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







