ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा कार्यभार शितल पाटील यांच्याकडे,डॉ.संगेवार यांचे अधिकार कमी,महाविकास आघाडीला अहवाल पुढील आठवड्यात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा कार्यभार शितल पाटील यांच्याकडे,डॉ.संगेवार यांचे अधिकार कमी,महाविकास आघाडीला अहवाल पुढील आठवड्यात

इचलकरंजी:
वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कारभार सुधारण्यासाठी आयुक्त पल्लवी पाटील यांनी आज खात्यात मोठे फेरबदल केले.त्यांनी काढलेल्या आदेशानुसार  श्री. मंगेश वासुदेव दुरुगकर यांच्याकडे सध्या रिक्त असलेले सहाय्यक आरोग्य अधिकारी पदाचा तात्पुरता पदभार सोपवण्यात आला आहे. ते प्रभाग समिती अ, ब, क आणि ड अंतर्गत स्वच्छता कामकाजावर नियंत्रण ठेवतील.
श्री. रफिक पेंढारी यांच्याकडे सध्याचा मुख्य स्वच्छता निरीक्षक पदाचा कार्यभार असून, त्यांना प्रभाग अ आणि व अंतर्गत कामकाजाचे नियंत्रण देण्यात आले आहे.श्री. महादेव मिसाळ यांच्याकडे मलेरिया आणि औषध फवारणी विभागाची पूर्णवेळ जबाबदारी देण्यात आली असून ते प्रभाग क आणि ड येथील कामकाजावर देखील नियंत्रण ठेवतील.
डॉ. सुनीलदत्त संगेवार यांच्याकडे आता केवळ वैद्यकीय आरोग्य व पशुवैद्यकीय विभाग, तसेच जन्म-मृत्यू आणि विवाह नोंदणी याचे कामकाज सोपवण्यात आले आहे.
श्री.शितल पाटील, वरिष्ठ लिपिक यांना घनकचरा विभागाचे प्रशासकीय प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. ते उपायुक्त (२) कार्यालयाचे काम सांभाळत हे काम पाहणार असून त्यांना प्र सहायक आयुक्त विजय राजापुरे सहकार्य करतील.
Advt
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने दिनांक १४ जुलै २०२५ रोजी आयुक्तांची भेट देत घनकचरा व्यवस्थापन विभागात झालेल्या कथित गैरकारभारासंदर्भात निवेदन दिले होते. यानंतर १८ जुलै अखेर अहवाल तयार करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती.
तथापि, २१ जुलै रोजी अति आयुक्त शिंदे मॅडम यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी “अहवाल अद्याप अपूर्ण असून आठ दिवसांची मुदत लागेल” असे सांगितले. त्यामुळे पुढील २८ जुलै २०२५ रोजी आयुक्त यांच्याशी पुन्हा चर्चा होणार आहे.या बैठकीस शशांक बावचकर, सागर चाळके आणि प्रकाश मोरबाळे उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा