ICHMH51NEWS.IN
9921600800

खुनी हल्ल्यातील दोन फरार आरोपींना तावडे हॉटेल जवळ पकडले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची यशस्वी कारवाई

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

खुनी हल्ल्यातील दोन फरार आरोपींना तावडे हॉटेल जवळ पकडले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची यशस्वी कारवाई

इचलकरंजी :

शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत रविवारी घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या खुनी हल्ल्याप्रकरणी फरार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तावडे हॉटेल परिसरातून अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी मयूर आकाराम पुजारी, ओंकार बिरु पुजारी, शुभम बोरसे, राहुल श्रीकांत कांबळे व बंडा शिंदे हे गुन्हा घडल्यानंतर फरार होते.

Advt

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. संतोष गळवे आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला होता. पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, आरोपी ओंकार पुजारी (रा. तिळवणी) व राहुल कांबळे (रा. आवळे गल्ली, इचलकरंजी) हे दोघे तावडे हॉटेल परिसरात कर्नाटकात पलायन करण्याच्या तयारीत असल्याबाबत समजले

सदर माहितीच्या आधारे पथकाने तातडीने तावडे हॉटेल परिसरात सापळा रचून दोघा आरोपींना दिनांक २१ जुलै रोजी सायंकाळी अटक केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार व श्री. अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पो.उ.नि. संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, शिवानंद मठपती, संतोष बरगे, प्रदीप पाटील, गजानन गुरव, विशाल खराडे, योगेश गोसावी, राजू कांबळे, सागर चौगले, महेश पाटील व अरविंद पाटील यांनी केली.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा