ICHMH51NEWS.IN
9921600800

प्रकाशराव सातपुते यांची रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० च्या डिस्ट्रीक सेक्रेटरीपदी निवड.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

प्रकाशराव सातपुते यांची रोटरी डिस्ट्रिक्ट
३१७० च्या डिस्ट्रीक सेक्रेटरीपदी निवड.

इचलकरंजी/प्रतिनिधी –
रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्या नविन पदाधिकारी, कार्यकारणी व निमंत्रित सदस्यांची मिटींग संपन्न झाली. यावेळी क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांची डिस्ट्रीक्ट सेक्रेटरी पदी निवड झालेबद्दल क्लबचे विद्यमान अध्यक्ष सुनिल कोष्टी यांचे अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ सदस्य प्रकाश दत्तवाडे यांचे हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

ADvt

रोटरी प्रोबस क्लब नऊ वर्षापासून कार्यरत असून जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक कॉन्फरन्स घेतलेला क्लब आहे. क्लबच्या माध्यमातून लोकोपयोगी सेवा, मार्गदर्शन, व्याख्यान, वैद्यकीय सेवा देण्यात येत येतात. त्यामध्ये प्रकाशराव सातपुते यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य नेहमीच लाभत असल्याचे सुनिल कोष्टी यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना रोटरी प्रोबस हा जिल्ह्यात सर्वात अ‍ॅक्टिव्ह असणारा क्लब असून या क्लबच्या कार्यामधूनच  डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी हा सन्मान मिळाला आहे. या सन्मानाला पात्र राहण्याचे काम मी करत राहिन, अशी ग्वाही प्रकाशराव सातपुते यांनी दिली. इचलकरंजीचे सुपुत्र अरूण भंडारे हे डिस्ट्रीक ३१७० चे गव्हर्नर असलेमुळे ही संधी मिळाल्याचे सांगितले.
यावेळी २६ जुलै रोजी होणार्‍या सायकल  वाटप कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. याप्रसंगी स्वागत क्लबचे सेक्रेटरी किरण कटके यांनी केले. आभार जयश्री चौगुले यांनी मानले. याप्रसंगी शिवबसु खोत, एम के कांबळे, सहसेक्रेटरी सौ. संगीता लडगे, दिलीप शेट्टी, काशिनाथ जगदाळे, सदाशिव काजवे, बाबासाहेब पाटील, हेमंत कवठे, आण्णासाहेब नंदाई, मल्लीकार्जुन तेग्गी, प्रभाकर उरणे, रमेश पाटील, सौ. निर्मला मोरे, शैलजा मिरगे, माया होगाडे, प्राजक्ता होगाडे, अजित कोईक आदींसह मान्यवर उपस्थित होते.

प्रकाश सातपुते यांचा सत्कार करताना प्रकाश दत्तवाडे व इतर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा