गुटखा, तंबाखू व सुगंधी पानमसाल्याची ५६ लाखांची अवैध वाहतूक उघडकीस
वडगाव पोलीस ठाण्याची मोठी कारवाई – आरोपीस अटक
वडगाव:
२२ जुलै २०२५ रोजी वडगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने एक मोठी कारवाई करत तब्बल ₹५६,३६,३३६/- किंमतीचा सुगंधी तंबाखू, गुटखा व पानमसाल्याचा साठा जप्त केला आहे. या अवैध मालाची वाहतूक करणाऱ्या MH-04-HS-1519 या आयशर ट्रकचाही समावेश आहे.
फिर्यादी पोलीस अंमलदार अनिल धुळाप्पा आष्टेकर हे वडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी २२ जुलै २०२५ रोजी सकाळी २ वाजता बेंगलोर-पुणे हायवेवरील हॉटेल उज्वल समोर, किणी, ता. हातकणंगले येथे सापळा रचून संशयित ट्रक थांबवला.
झालेल्या तपासणीत ट्रकमध्ये शशि शेखर एंटरप्रायजेस, धारवाड – कर्नाटक व S.K.L. एंटरप्रायजेस, वाराणसी – उत्तरप्रदेश निर्मित गुटखा, तंबाखू व पानमसाला मोठ्या प्रमाणावर आढळून आला. संबंधित पदार्थांमध्ये शुद्ध प्लस सिल्वर पान, एस सिल्वर च्युईंग तंबाखू, नवी च्युईंग तंबाखू, वराणसी आशिक टोबॅको अशा विविध ब्रँड्सचा समावेश आहे.याप्रकरणी फतरू मशायक पटेल (वय ४९ वर्षे, रा. महमदनगर, लातूर) याला ताब्यात घेण्यात आले आहे.वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास पो.नि. प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








