इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त राजवाडा चौक येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सहा.आयुक्त रोशनी गोडे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, संदीप जोशी, अशोक कमते, महेश बुचडे, दिलीप मगदूम आदी उपस्थित होते.
फोटो- लोकमान्य टिळक यांना अभिवादन करताना आयुक्त पल्लवी पाटील,अति आयुक्त सुषमा शिंदे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







