ICHMH51NEWS.IN
9921600800

मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत इचलकरंजी महानगर पालिकेच्या शाळांमध्ये संस्कार शिबिरांत साडेसात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत इचलकरंजी महानगर पालिकेच्या शाळांमध्ये संस्कार शिबिरांत साडेसात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

इचलकरंजी
 राज्य शासनाच्या माननीय मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान २०२५ अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिका अधिनस्त सर्व शाळांमध्ये दिनांक १७ जून २०२५ ते ९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत संस्कार शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरांना विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शाळांमध्ये शिस्त, वेळेचे महत्त्व, स्वच्छता, पर्यावरण जागृती, सहकार, संघभावना, देशभक्ती, समाजसेवा, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, ‘गुड टच-बॅड टच’ यांची जाणीव, मुलांचे स्क्रीन टाईम कमी करणे व मातापित्यांचा सन्मान या महत्वपूर्ण मूल्यांवर आधारित सखोल प्रशिक्षण व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना या माध्यमातून दिले जात आहे.
सदर उपक्रमात महापालिकेच्या सुमारे ७५०० विद्यार्थ्यांनी तसेच खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून, मुलांमध्ये सकारात्मक बदल आणि चारित्र्यविकास घडवून आणण्यासाठी ही शिबिरे उपयोगी ठरत आहेत.
        या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणी साठी  आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, आणि प्रशासन अधिकारी इरफान पटेल यांनी अत्यंत कुशल नियोजन व वेळेवर समन्वय साधून मार्गदर्शन केले. शिक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे. विशेष म्हणजे, नुकतेच महापालिकेला लाभलेले नवीन शिक्षणाधिकारी श्री.बी  एम कासार यांचेही मार्गदर्शन या उपक्रमास लाभले असून, त्याचा थेट फायदा शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिबिरांवर झाला आहे.
हा उपक्रम ९ ऑगस्ट २०२५ पर्यंत सातत्याने राबविला जाणार असून, प्रत्येक आठवड्यात विविध अंगाने विद्यार्थ्यांमध्ये मूल्यवर्धनाचा प्रयत्न केला जात आहे. शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि विद्यार्थ्यांनी मिळून या उपक्रमाला एक शैक्षणिक चळवळ बनविले आहे.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या शिक्षण क्षेत्रामध्ये ही संकल्पना नव्या उंचीवर नेणारी ठरली असून, भविष्यातही अशा उपक्रमांची गरज असल्याचे सर्व स्तरांतून मत व्यक्त केले जात आहे.
फोटो-  एक पेड मा के नाम….. आणि संस्कार शिबिर
PMSHRI MSB URDU SCHOOL NO 46 
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा