ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीईमधील ५० विद्यार्थ्यांनीची नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये निवड.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईमधील ५० विद्यार्थ्यांनीची नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये निवड.

इचलकरंजी ता. २४ जुलैः
डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट इंजिनिअरींग विभागातील एकूण ५० विद्यार्थ्यांनींनी आपली गुणवत्ता सिध्द करत, विविध आघाडीच्या कॅपजेमिनी, इन्फोसिस या आयटी कंपन्यांमध्ये यशस्वीरीत्या प्लेसमेंट मिळवून संस्थेच्या इतिहासात एक गौरवशाली नोंद केली आहे. ही निवड डीकेटीई संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षणपध्दतीची, आधुनिक तंत्रज्ञानातील सक्षम प्रशिक्षणाची आणि मुलींच्या शिक्षणास दिलेल्या प्रोत्साहनाची साक्ष आहे संस्थेच्या संचालिका डॉ एल.एस.अडमुठे यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली.
Advt
कॅपजेमिनी या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये ३७ विद्यार्थीनी तर इन्फोसीस या भारतातील प्रथितयश कंपनीमध्ये १३ विद्यार्थ्यांनींची निवड झाली आहे. हा एक स्तुत्य आणि प्रेरणादायी क्षण आहे की संपूर्ण निवड झालेल्यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. हे यश केवळ त्यांच्या तांत्रिक कौशल्याचे नव्हे, तर चिकाटी, आत्मविश्‍वास, उत्कृष्ट संवाद कौशल्य आणि कठोर मेहनतीचे फलित आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी डीकेटीई पॅटर्नचा योगदान असून यामध्ये योग्य कटिबध्द, नियोजनबध्द व दुरदृष्टीपूर्ण प्रयत्न आहेत संस्थेच्या प्लेसमेंट सेलने फक्त कंपन्याशी संपर्क साधून संधी निर्माण केल्या नाहीत तर विद्याथ्यार्थिंनींना त्या संधीचा पुरेपूर लाभ घेता यावा यासाठी संपूर्ण वर्षभर विविध प्रकारचे प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले. यामध्ये मॉक इंटरव्हयूव, ऍप्टीटयूड टेस्टचे आयोजन, सॉफट स्कील, कम्युनिकेशन स्कील, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ग्रुप डिस्कशन यामुळे विद्यार्थ्यांचा अत्मविश्‍वास वाढला जातो व इंटरव्हयूवसाठी विद्यार्थ्यांना फायदा होतो.
कॅपजेमिनी व इन्फोसीस या कंपन्या जगभर डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन, अर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड, सायबर सिक्युरिटी, डेटा ऍनालिटिक्स अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करणा-या कंपन्या असून, त्या गुणवत्तापूर्ण व बहुपरिमाणदृष्टया सक्षम तरुणींची निवड करत असतात. डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनींनी या सर्व कसोटयांवर खरे उतरत आपल्या क्षमतेचे व हुशारीचे दर्शन घडवले आहे. या यशामागे विद्यार्थ्यांनींची जिदद, अभ्यासातील सातत्य, स्पष्ट संकल्पना, तसेच संस्थेच्या प्लेसमेंट सेलचे आणि प्राध्यपकांचे वेळोवेळी दिलेले प्रभावी मार्गदर्शन ही प्रमुख कारणे आहेत.
या अभूतपूर्व यशामुळे ‘डीकेटीईच्या मुलींनी‘ आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवत नव्या पीढीसाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे असे गौरवाउदगार संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे यांनी व्यक्त केले.
या गौरवशाली कामगिरीबददल संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी विद्यार्थ्यांनींचे अभिनंदन करीत त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या यशस्वी घडामोडीमध्ये संचालिका डॉ एल.एस.अडमुठे, उपसंचालक डॉ यु.जे.पाटील, सर्व विभागप्रमुख, टीपीओ प्रा.जी.एस.जोशी व टीपीओ समन्वयक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळी – कॅपजेमिनी, इन्फोसिस मध्ये निवड झालेल्या डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा