ICHMH51NEWS.IN
9921600800

शिवाजीनगर पोलिसांची कारवाई २९,९७० किंमतीचा अवैध दारू साठा जप्त.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवाजीनगर पोलिसांची कारवाई २९,९७० किंमतीचा अवैध दारू साठा जप्त.

इचलकरंजी

शिवाजीनगर पोलीस ठाणे (इचलकरंजी) हद्दीत २३ जुलै २०२५ रोजी दोन ठिकाणी कारवाई करत बेकायदेशीर देशी दारू विक्री करणाऱ्या आरोपींकडून एकूण २९,९७० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पहिल्या प्रकरणात आरोपी गणपती चव्हाण व सुरेश चव्हाण यांच्या ताब्यातून ४२ देशी दारूच्या बाटल्या, रोख रक्कम, गोदरेज कंपनीचा फ्रिज, पंखा, खुर्ची असा २०,७१०/- मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ADvt

दुसऱ्या प्रकरणात आरोपी दीपक निपाणे याच्याकडून ५३ देशी दारूच्या बाटल्या, व्हर्लपूल कंपनीचा फ्रिज, प्लास्टिक खुर्ची व ट्रे असा ९,२६०/- मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या दोन्ही कारवायांत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे नोंद करण्यात आले असून तपास पो.नि. दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार रावसाहेब कसेकर करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा