ICHMH51NEWS.IN
9921600800

शहापूर पोलीसांचा जुगार अड्ड्यावर छापा, सात आरोपींवर गुन्हा दाखल,३.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शहापूर पोलीसांचा जुगार अड्ड्यावर छापा, सात आरोपींवर गुन्हा दाखल,३.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी

शहापूर पोलीस ठाणे (इचलकरंजी) हद्दीतील खोतवाडी गावातील गौरीशंकर नगर परिसरात दिनांक २४ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री २.१० वाजता सात जण जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. शिंदे गल्लीतील एका घरावर छापा टाकून पोलिसांनी तीनपत्ती जुगार खेळणाऱ्या गोविंद कांबळे, राहुल शेळके, वैजनाथ साळुंखे, आशिष वाकरे, नारायण साळुंखे, सिद्धार्थ गागडे, व तात्या साळुंखे (सर्व रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) सात जणांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

ADvt

यावेळी ६,३५० रुपये रोख रक्कम १,०४,५०० किंमतीचे ५ मोबाईल हँडसेट व २,३५,००० किंमतीच्या ४ मोटारसायकली असा ३,४५,८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

या प्रकरणी पो.ना. आयुब गडकरी यांनी फिर्याद दिली असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो.नि. सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई दरेकर करत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा