ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत अपघातात युवक ठार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत अपघातात युवक ठार

इचलकरंजीच्या डेक्कन चौक येथे 27 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात सौरभ उर्फ गणेश भिसे (वय २५ रा. विठ्ठल नगर, शहापूर) याचा मृत्यू झाला. तो स्प्लेंडर मोटरसायकल (MH09AV3146) वरून येत असताना अशोक लेलँड पिकअप (MH09ES8975) वाहनाजवळून जाताना गाडीचा ताबा सुटून जोरदार धडक दिली. डोक्याला गंभीर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. फिर्यादी जयेश माने यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पो.हे.काँ. इंदुलकर करत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा