ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत चार ठिकाणी जुगार अड्ड्यांवर धाड – ३९ आरोपी ताब्यात, ५.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत चार ठिकाणी जुगार अड्ड्यांवर धाड – ३९ आरोपी ताब्यात, ५.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर,इचलकरंजी पोलीस ठाणे व शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडील पथकाने २६ जुलै २०२५ रोजी चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून जुगार अड्ड्यावर कारवाई केली. या कारवायांमध्ये एकूण ३९ आरोपींना अटक करण्यात आली असून ५,३७,७६३/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आसरा नगर येथील कारवाईत
रोख रक्कम,१३ मोबाईल,२ दुचाकी,जुगार साहित्य असा १,४८,९००/- रुपयांचा मुद्देमाल व अमन अमजद नदाफ, फैयाज शेख महंमद, उमर शेख, सद्दाम शेख, शेख सलमान, अकबर मणेर, अय्युब शेख, समीर शेख, शकील मुल्ला, अजहर सय्यद, इरफान तांबोळी, सरफराज शेख, युनूस इनामदार, फैसल मुल्ला, मोहसिन नदाफ, फखरुद्दीन शेख, शाहबाज शेख यांना ताब्यात घेण्यात आले.

विक्रमनगर येथील कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, १ दुचाकी, जुगार साहित्य १,०२,००० रुपयांचा मुद्देमाल व नासीर तांबोळी, आसिफ बागवान, सलमान इनामदार, जुनैद शेख, अजित कांबळे, गणेश पाटील, महेश मोहिते, दिलीप पाटील, संजय सुतार, विजय चौगुले यांना ताब्यात घेण्यात आले शाहू कॉर्नर येथील कारवाईत रोख रक्कम, ५ मोबाईल,१ दुचाकी,जुगार साहित्य असा ९४,७०० रुपयांचा मुद्देमाल व सुनील कुंभार, राजेंद्र बागडे, किरण शिंदे, नितीन कांबळे, दत्तात्रय पाटील, नामदेव कांबळे, संदीप साळुंखे यांना ताब्यात घेण्यात आले तरवरदविनायक मंदिराजवळ, इचलकरंजी  येथील कारवाईत रोख रक्कम,७ मोबाईल, २ दुचाकी, जुगार साहित्य असा १,४९,७००/-  रुपयांचा मुद्देमाल व अशोक गुरव, सुनील पाटील, संतोष शिंदे, प्रमोद पाटील, सुहास बागडे, रविकिरण कांबळे, दिनेश पाटील, अशोक वाघमारे यांना ताब्यात घेण्यात आले. एकूण ३,९५,२७०/- रोख रक्कम, ३२ मोबाईल, ६ दुचाकी, जुगार साहित्य व ३९ आरोपी ताब्यात घेतले आहेत.

सदर कारवाया मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार व श्री. अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ, पो.उपनिरीक्षक संतोष गळवे आणि पथकातील प्रदीप पाटील, वैभव जाधव, वैभव पाटील, विशाल खराडे, शिवानंद मठपती, राजू कांबळे, योगेश गोसावी, गजानन गुरव, अरविंद पाटील, अशोक पोवार, सुशिल पाटील, अमोल कुरणे, सचिन शिंदे यांनी केल्या.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा