ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजचे उद्घाटन थाटात संपन्न.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजचे उद्घाटन थाटात संपन्न

इचलकरंजी, –

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज या शहरातील पहिल्या विधी महाविद्यालयाचे उद्घाटन उत्साहात व थाटामाटात पार पडले. संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे व माजी खासदार निवेदिता माने (वहिनी) यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभ झाला.

Advt

यावेळी संस्थेचे सेक्रेटरी प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, सीईओ कौस्तुभ गावडे, ॲड. रामकृष्ण तोष्णीवाल, ॲड. विवेक घाटगे, श्रीराम साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेमागील उद्देश, सामाजिक योगदान व कायदाशिक्षणाच्या गरजेवर प्रकाश टाकला.

समारंभात दीपप्रज्वलन, फलक अनावरण, प्रतिमापूजन, प्रास्ताविक व सत्कार समारंभ पार पडले. सूत्रसंचालन डॉ. अतिष पाटील यांनी केले तर आभार प्राचार्या शुभांगी गावडे यांनी मानले. विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, पत्रकार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्धाटन प्रसंगी माजी मंत्री प्रकाश आवाडे,माजी खासदार निवेदिता माने,अभयकुमार साळुंखे व इतर

मनोगत व्यक्त करताना अभयकुमार साळुंखे

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा