ICHMH51NEWS.IN
9921600800

स्वामी मळा परिसरातील सांडपाणी समस्येवर नागरिकांचा संताप; ४ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

स्वामी मळा परिसरातील सांडपाणी समस्येवर नागरिकांचा संताप; ४ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा

इचलकरंजी

इचलकरंजी महापालिका हद्दीतील स्वामी मळा परिसरात सांडपाण्याची गटार बंद केल्यामुळे नागरिकांना तीव्र त्रास सहन करावा लागत आहे.फरशी कारखाना गल्लीत अॅड. मुजावर यांनी त्यांच्या खासगी मिळकतीतून गटार जात असल्याने ती बंद केल्यामुळे सांडपाणी गटारीऐवजी रिकाम्या जागेत साचत आहे.पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली असून दुर्गंधी, डास, ताप-डेंगूसारखे आजार पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शशिकांत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या शिष्टमंडळाने उपाआयुक्त अशोक कुंभार यांच्याकडे निवेदन देऊन तात्काळ गटारीची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. अन्यथा सोमवार, ४ ऑगस्ट २०२५ पासून महापालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनप्रसंगी राकेश मोरे, रामचंद्र जाधव, आनंद मोरे, अनिल मोरे, सौ. मोरे, सौ. पाटील यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा