जनतेचा सर्वार्थाने विश्वास संपादन करणारी आर्य चाणक्य पतसंस्था-लेखापरिक्षक श्री संजय व्हनबट्टे.
इचलकरंजी:
समाजाभिमुख व्यवहार करुन त्यांच्या ठेवींचे उत्तम रक्षण केले जावे या भावनेने ज्या संस्था नावारुपाला आल्या त्यामध्ये श्री आर्य चाणक्य पतसंस्थेचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल असे गौरवोद्गार प्रसिद्ध सी.ए. श्री संजय व्हनबट्टे यानी काढले. ते आर्य चाणक्य पतसंस्थेच्या घोरपडे नाट्यगृहात आयोजित केलेल्या ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थितानमध्ये व्यासपिठावर बॅंक फेडरेशनच्या प्रांत उपाध्यक्षा सौ. वैशालीताई आवाडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर विभाग सहसंघचालक श्री भगतरामजी छाबडा, संस्थापक अध्यक्ष श्री जवाहर छाबडा, विद्यमान अध्यक्ष श्री राजेंद्र राशिनकर, उपाध्यक्ष श्री पंकज मेहता व सर्व संचालक, सभासद व सेवक वर्ग उपस्थित होते.
सभेची सुरुवात उपस्थित मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलनाने झाली . त्यानंतर स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक चेअरमन मा.श्री. जवाहरजी छाबडा यांनी केले. अहवाल वाचन चेअरमन श्री. राजेंद्र राशिनकर यांनी केले. सध्या संस्थेचे २४९५० सभासद असून वसूल भागभांडवल ९ कोटी २२ लाख, खेळते भांडवल २७६ कोटी व निधी २२ कोटी तर ठेवी २२२ कोटी ०७ लाख तर कर्जे १४९ कोटी ४७ लाख आहेत. गुंतवणूक १०७ कोटी २९ लाख आहे. संस्थेला निव्वळ नफा २ कोटी ९२ लाख ३७ हजार ८९३ इतका झाला असून , नेट एनपीए शून्य टक्के आहे, असे सांगितले. तसेच संस्था कार्यक्षेत्र जिल्हा मर्यादित होते आता कोल्हापूर, सांगली, सातारा असे तीन जिल्हे कार्यक्षेत्र वाढ झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. यानंतर नोटीस वाचन व विषय पत्रिका वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अमित पोवार यांनी केले उपस्थित सभासदांनी एकमताने सर्व विषयास मंजूरी दिली. याप्रसंगी सामाजिक व राजकीय क्षेत्रात विविध पदावर नियुक्त झालेल्या संचालक व सल्लागार यांचा सत्कार प्रमुख पाहुणे सी.ए. श्री.संजय व्हनबट्टे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच बॅंक फेडरेशनच्या प्रांत उपाध्यक्षा सौ. वैशालीताई आवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यानंतर इचलकरंजी विधानसभेचे माजी आमदार श्री. सुरेशराव हाळवणकर यांनी संस्थेचा 500 कोटी ठेवी पूर्ण झालेस महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिल्याप्रमाणे त्यांना पुन्हा संस्थेच्या कार्यक्रमास स्वत: पुढाकार घेऊन येईन असे उद्गार काढले व संस्थेच्या प्रगतीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध चार्टर्ड अकौंटंट श्री. संजय व्हनबट्टे यांनी गुंतवणूक करणारे अनेक पर्याय आज समाजामध्ये उपलब्ध आहेत मात्र गुंतवणूक करुन छान झोप घ्यायचे असेल तर आर्य चाणक्य पतसंस्थेसारखा पर्याय आज उपलब्ध आहे त्याचा फायदा ग्राहक वर्गाने घ्यावा असे आवाहन करुन भाषणाच्या शेवटी चाणक्यांचे नाव घेवून अर्थसेवा करणारी आर्य चाणक्य पतसंस्था ही सर्वमान्य संस्था आहे. असे गौरवोद्गार काढले व श्री आर्य चाणक्य पत संस्थेच्या सामाजिक कार्याबद्दल समाधान व्यक्त करून संचालक व कर्मचारी यांना धन्यवाद दिले. सदर सभेचे सूत्र संचालन संस्थेचे संचालक श्री. अरविंद कुलकर्णी व श्री. पंडित ढवळे यांनी केले शेवटी संचालक श्री. नरेंद्र पुरोहित यांनी आभार मानले. तर संचालक श्री. अरविंद कुलकर्णी यांनी संपूर्ण वंदे मातरम म्हणून सभा संपन्न झालेचे जाहीर केले.
वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना संजय व्हनबट्टे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







