स्व. मोहम्मद रफी यांना ४५व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, इचलकरंजीत श्रद्धांजली गीतांचा कार्यक्रम
इचलकरंजी
इचलकरंजी शहरात भारतीय संगीत क्षेत्रातील महान गायक स्वर्गीय मोहम्मद रफी यांची ४५ वी पुण्यतिथी इचलकरंजी कलाकार मंच यांच्या वतीने अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात रफींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय रफी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली. यानंतर कराओकेवर आधारित एक भावनिक गायन कार्यक्रम पार पडला. या वेळी इचलकरंजी कलाकार मंचचे संस्थापक सॅम संजापुरे, आसिफ संजापुरे, इचलकरंजी कलाकार मंचचे अध्यक्ष सुनील तमायचे तसेच मोहन नवले, आकाश नवले, पप्पू नवले, महेश मीनेकर, मुबारक शेख आणि संदीप महिंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात शहरातील अनेक नामवंत गायक कलाकारांनी सहभाग घेत रफी यांचे अजरामर गाणे सादर करून त्यांना संगीतात्मक श्रद्धांजली वाहिली. यामध्ये कपिल मलके, विजय मछले, आनंदा बुचडे, युवराज कांबळे, शितल मीनेकर, सचिन मांजरे, विशारद तमायचे, अनिकेत नवले आणि विजय बागल या कलाकारांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी रफी यांचे संगीत क्षेत्रातील योगदान स्मरून, त्यांच्या आवाजाची जादू कालातीत असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाने रसिक श्रोत्यांची मनं जिंकली आणि रफी यांच्या अजरामर आठवणींना उजाळा देत एक संस्मरणीय संगीत संध्या साकारली.
मोहम्मद रफी यांच्या प्रतिमेचे पुजन करताना सुनील तमायचे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







