ICHMH51NEWS.IN
9921600800

आपटे वाचन मंदिर अध्यक्षपदी सुषमा दातार,उपाध्यक्षपदी काशिनाथ जगदाळे.निवडणूक बिनविरोध

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आपटे वाचन मंदिर अध्यक्षपदी सुषमा दातार,उपाध्यक्षपदी काशिनाथ जगदाळे.निवडणूक बिनविरोध

इचलकरंजी:

   शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी आपटे वाचन मंदिराच्या सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी अध्यक्षपदी सुषमा दातार यांची तर उपाध्यक्षपदी काशिनाथ जगदाळे यांची निवड झाली. कार्यवाहपदी प्रा. मोहन पुजारी व सहकार्यवाहपदी डॉ. सुजित सौंदत्तीकर यांची निवड झाली. संस्थेच्या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळ सदस्यांची बैठक संस्थेच्या ज्येष्ठ संचालक हर्षदा मराठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी सर्वानुमते ही पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. आपटे वाचन मंदिराच्या संचालक मंडळाच्या ११ जागांची सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी नुकतीच बिनविरोध निवडणूक संपन्न झाली. निवडणूक अधिकारी म्हणून श्री.विजय कामत यांनी काम पाहिले. संस्थेच्या वार्षिक सभेत नवनिर्वाचित संचालकांची नावे जाहीर करण्यात आल्यानंतर पदाधिकारी निवडीसाठी सदर बैठक संपन्न झाली.                                         नवीन संचालक मंडळात वरील पदाधिकाऱ्यांसोबत अँड. स्वानंद कुलकर्णी, हर्षदा मराठे, संजय सातपुते, राजेंद्र घोडके, बाळासाहेब कलागते, मीनाक्षी तंगडी, अभिजीत होगाडे यांची संचालक म्हणून निवड झाली आहे. स्वीकृत संचालक म्हणून माया कुलकर्णी, प्रशांत बापट आणि श्रीकांत चंगेडिया यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक डॉ. अशोकराव सौंदत्तीकर यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळास व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. सर्वांनी ग्रंथालयाचा लौकिक वृद्धिंगत करावा आणि लहान मुलांपर्यंत पुस्तके पोहोचवून त्यांना संस्कार द्यावेत म्हणजे ही मुले उद्याचे देशाचे सजग आणि परिपक्व नागरिक बनतील असे सांगितले. ग्रंथालयाचे माजी अध्यक्ष अँड. स्वानंद कुलकर्णी यांनी ग्रंथालयाने काळानुसार आधुनिकीकरणाची कास धरली पाहिजे अशी भावना व्यक्त केली. याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष सुषमा दातार यांनी ग्रंथालयाच्या सर्व सभासदांनी दर्शविलेल्या विश्वासाला पात्र राहून वाचन संस्कृती रुजविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. नवनिर्वाचित कार्यवाह प्राध्यापक मोहन पुजारी यांनी आभार व्यक्त केले.
पदाधिकारी निवडीनंतर नुतन संचालक मंडळ.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा