ICHMH51NEWS.IN
9921600800

शहापूरमध्ये बंद गाळ्यातून दोन शिलाई मशीनची चोरी – ३४,५०० रुपयांचा ऐवज लंपास

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शहापूरमध्ये बंद गाळ्यातून दोन शिलाई मशीनची चोरी – ३४,५०० रुपयांचा ऐवज लंपास

इचलकरंजी

शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळजाभवानी अपार्टमेंटमधील एका गारमेंट गाळ्यातून अज्ञात चोरट्याने तब्बल ३४,५००/- रुपये किमतीची दोन शिलाई मशीन चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी श्वेता दीपक कोळेकर (वय २७, रा. तुळजाभवानी अपार्टमेंट, शहापूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ते ३० जुलै रोजी सकाळी ९ या वेळेत बिल्डिंग नं. 2-B मधील गाळा क्र. A-06 मधून Jack A2 कंपनीच्या दोन शिलाई मशीन (प्रत्येकी १८,००० व १६,५०० रुपये किंमतीच्या) चोरीस गेल्या आहेत.

अज्ञात चोरट्याने गाळ्याचे शटरचे लॉक तोडून आत प्रवेश करत चोरी केली. याप्रकरणी पोलिस नाईक  बांगर यांनी फिर्याद दाखल केली असून पो.हे.कॉ. कांबळे तपास करत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा