पाणीटंचाईचे संकट, पण लाखो लिटर पाणी वाया – दुरुस्ती असूनही गळती सुरूच
व्हिडीओ- https://youtube.com/shorts/mT1lHS-0LLs?si=SgAN5kqLzS3oJ1K2
इचलकरंजी
इचलकरंजी शहराला ४ ते ५ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असताना, शहरातील अनेक भागांमध्ये जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पद्मा पॉवर लॉन्ड्री जवळील दत्तनगर भाटले मळा, गल्ली क्रमांक १ येथे गेल्या कित्येक दिवसांपासून जलवाहिनीतून पाणी गळती सुरू असून, लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या ठिकाणी अनेक वेळा दुरुस्तीचे काम झाले, तरी काही दिवसांनी पुन्हा गळती सुरू होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
सध्या शहराला वेळेआड पाणी मिळत नसताना, गळतीमुळे शेकडो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र अनेक भागांमध्ये दिसून येत आहे. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.त्वरित आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







