इचलकरंजीत पान मसाला, गुटखा व माव्यासह एक जण अटक
इचलकरंजी
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने ए.एस.सी. कॉलेजसमोर भाग्यलक्ष्मी पान शॉपवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात पान मसाला, गुटखा, सुगंधी सुपारी व मावा जप्त केला. आरोपी सुनिल मारुती बिरंजे (रा. जवाहरनगर, वय ३९) याच्याकडून एकूण ९०९६/-किमतीचा मुद्देमाल मिळाला.
जप्त केलेल्या वस्तूंमध्ये केसर युक्त विमल, V-1 तंबाखू, मुसाफिर, RMD, रजनीगंधा, RN पान मसाला, एम सुगंधी तंबाखू, कच्ची सुपारी, ओला व सुका मावा आदींचा समावेश आहे. आरोपीने हे सर्व विनापरवाना व विक्रीसाठी साठवले असल्याचे तपासात स्पष्ट झाले.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नि. परुळे करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







