ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेएएससी महाविद्यालयात एनसीसी विभागात रक्षाबंधन संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेएएससी महाविद्यालयात एनसीसी विभागात रक्षाबंधन संपन्न.

 इचलकरंजी:
येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयात एनसीसी विभागाच्या वतीने रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी एनसीसी कॅडेट मुलींनी प्राचार्य डॉ. एस. के. खाडे, यांच्यासह उपस्थित मान्यवर आणि एनसीसी कॅडेट यांना राखी बांधून आणि औक्षण करून रक्षाबंधन साजरा केला.
        ” भारतीय सण हे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत असतात. महाविद्यालयात असे उपक्रम साजरे केल्याने विद्यार्थ्यांमध्ये बंधुत्वाची भावना कायम राहते त्यामुळे असे उपक्रम नेहमी राबवले पाहिजेत ही आनंदाची बाब आहे.” अशा भावना व्यक्त करत प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांनी मुलांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या.
          यावेळी महाविद्यालयाचे दुपार सत्र प्रमुख प्रा. डी. ए. यादव, प्रबंधक श्री. आर. बी. जोग यांची विशेष उपस्थिती होती. एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. विनायक भोई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रा. रोहित शिंगे यांनी प्रास्ताविक केले. लेफ्टनंट प्रा. विनायक भोई यांनी आभार मानले. यावेळी एनसीसी कॅडेट आणि विद्यार्थी उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा