घंटागाडी कचरा संकलन घोटाळा : महाविकास आघाडीची कारवाईची मागणी
इचलकरंजी – इचलकरंजी महानगरपालिकेच्या घंटागाडी द्वारे कचरा संकलन व वाहतूक कामामध्ये मोठ्या गैरव्यवहार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. या संदर्भात अति.आयुक्तांना दिलेल्या निवेदनात सखोल चौकशी करून संबंधित मक्तेदार व अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीने १४ जुलै रोजी दिलेल्या लेखी तक्रारीनंतर आयुक्तांनी चौकशी समिती नेमली होती. समितीने मुदतवाढ घेत ११ ऑगस्ट रोजी आपला अहवाल सादर केला. मात्र हा अहवाल वस्तुस्थितीशी विसंगत असून मक्तेदार व अधिकाऱ्यांना अभय देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आघाडीने केला आहे.
चौकशीत ६८ पैकी फक्त ५४ घंटागाड्या सुरू असून बंद गाड्यांवरही खर्च दाखवला.
४ टिप्पर व ४ कॉम्पॅक्टर पैकी प्रत्येकी १ बंद असूनही त्यांचा पगार, मेंटेनन्स व डिझेल खर्च अदा केलेला आहे.
जेसीबी, पोकलेन व क्रेन वापराचे देयक बेकायदेशीरपणे मंजूर केले आहे.कचरा डेपोवरील वजन काटा तीन महिन्यांपासून बंद असताना देखील मक्तेदारास देयके अदा कशी केली.डिसेंबर २०२४ मध्ये दाखवलेले यंत्रसामग्री वापराचे तास संशयास्पद व अहवालाविना आहेत.
महाविकास आघाडीने या प्रकरणातील बेकायदेशीर देयके मक्तेदार कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याची मागणी केली आहे. अन्यथा न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावेळी शशांक बावचकर, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







