ICHMH51NEWS.IN
9921600800

कन्या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताह उत्साहात साजरा….

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कन्या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताह उत्साहात साजरा….

इचलकरंजी
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या गृह विज्ञान विभागातर्फे राष्ट्रीय पोषण सप्ताह मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला. भारत सरकार तर्फे दरवर्षी एक ते सात सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो. लोकांमध्ये योग्य आहाराचे महत्त्व, निरोगी खाण्याचे सवयी आणि कुपोषणाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजी मधील प्रसिद्ध आहार तज्ञ माननीय सौ पद्मा बरगाले उपस्थित होत्या.

Advt


त्यांनी,अन्न म्हणजे फक्त पोट भरून ठेवणे नाही तर आरोग्य शक्ती आणि जीवनाचा आधार आहे, त्यामुळे चांगल्या जीवनासाठी योग्य आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे, असे सांगितले.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब दुधाळे उपस्थित होते,त्यांनी आपल्या मनोगतामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्य नीट राहायचे असेल तर योग्य आहार घेणे गरजेचे आहे, रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपलं मन तजेलदार असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे, असे सांगितले.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक गृहविज्ञान विभाग प्रमुख प्रा.संगीता पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रतिभा पैलवान यांनी केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मार्गदर्शन करताना डॉ पद्मा बरगाले,व्यासपीठावर प्राचार्य बाबासाहेब दुधाळे
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा