गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान तरुणावर चाकूने हल्ला
इचलकरंजी:
अनंत चतुर्थीच्या दिवशी इचलकरंजी शहरातील मलाबादे चौक येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी इचलकरंजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी उर्फ रुपेश भरत वाघ (वय ३२, रा. जवाहरनगर, इचलकरंजी) हे ६ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास जनता चौक येथे विसर्जन मिरवणूक पाहत होते. त्या वेळी तुषार अरुण आवळे (रा. आवळे गल्ली, इचलकरंजी) हा इसम गर्दीत धक्काबुक्की करीत पुढे जात होता. त्याने फिर्यादींना धक्का दिल्याने वाद झाला.
या दरम्यान आरोपीने शिवीगाळ करत झटापट केली. त्यानंतर हाताने व लाथाबुक्याने मारहाण करून खिशातून चाकूसदृश हत्यार काढत फिर्यादींच्या कपाळावर व छातीवर वार करून जखमी केले.
फिर्यादीच्या तक्रारीवरून इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







