सुरक्षारक्षक नेमणुकीवरून इनामचा संताप प्रशासनास धारेवर धरत महापालिकेचा प्रस्तावित मुदतवाढीचा करार थांबवण्याची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा. व्हिडीओ-https://youtu.be/t0f6zr9MLY8?si=sS2SzLqj8KsJ2Zmi
इचलकरंजी –
इचलकरंजी महानगरपालिकेत सुरक्षारक्षक नेमणूक करारास मुदतवाढीवरून संतापाची लाट उसळली आहे. महापालिकेकडे मोठ्या प्रमाणावर सुरक्षारक्षक कार्यरत असून त्यावर महिन्याला लाखो रुपयांचा अपव्यय होत असल्याची टीका करण्यात आली. प्रस्तावित मुदतवाढीचा करार तातडीने थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा इनाम सदस्य व नागरिकांनी दिला.
सुरक्षारक्षकांचे काम नागरिकांना अडवणे, निवेदन ताब्यात घेऊन वाचणे, कुणाला द्यायचे ते ठरवणे,अरेरावी करणे,अशा स्वरूपाचे सुरू असून सामान्य नागरिकांना दहशतवादी असल्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला. आयुक्त,अति आयुक्त,उपायुक्त यांच्यासह कार्यालयीन गाड्यांनाही सुरक्षारक्षक लावण्यात आले आहेत. आमदार-खासदारांनाही एवढी सुरक्षा नसताना महापालिकेवर अनावश्यक खर्च होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर इनाम सदस्यांनी अति आयुक्त सुषमा शिंदे यांच्या दालनात तीव्र संताप व्यक्त करत, “महापालिका नागरिकांची आहे आणि नागरिकांचीच राहील. सुरक्षारक्षकांच्या करारावर सही करू नका. त्यांना सन्मानाने निरोप द्या. मासिक दहा लाखांचा व वार्षिक कोट्यावधींचा खर्च बंद करा,” अशी मागणी केली.
यावेळी राजू कोंन्नुर,अमोल मोरे, राम आडकी,डॉ. सुप्रिया माने, कल्पना माळी,महेंद्र जाधव,विद्यासागर चराटे,उमेश पाटील,अमितकुमार बियाणी, सिद्धार्थ इंगवले,अमोल ढवळे,अभिजित पटवा उपस्थित होते.
सुरक्षारक्षक करार थांबवावा या मागणीसाठी अति आयुक्त सुषमा शिंदे यांना निवेदन देताना डॉ.सुप्रिया माने,कल्पना माळी,उमेश पाटील,राजु कोंनूर,महेंद्र जाधव,अमोल मोरे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







