शशांक बावचकर यांच्या वैचारिक प्रेरणेतून ग्रंथप्रदानाचा उपक्रम-प्रबोधन वाचनालयात ६१ पुस्तके भेट.
इचलकरंजी:
प्रबोधन वाचनालयाचे अध्यक्ष शशांक बावचकर यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. एन. एस. यु. आय. चे इचलकरंजी शहराध्यक्ष रविराज पाटील यांनी प्रबोधन वाचनालयाला साहित्याच्या विविध प्रकारातील उत्तमोत्तम अशी नव्या एकसष्ठ ग्रंथांची भेट दिली. या ग्रंथप्रदानाच्या उपक्रमातून शशांक बावचकर यांचा वाढदिवस एक वेगळ्या आणि अनुकरणीय पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना रविराज पाटील म्हणाले, “शशांक बावचकर यांच्या वैचारिक प्रभावामुळेच ग्रंथभेटीची ही कल्पना सुचली. वाचनसंस्कृती वाढावी, या हेतूने हा उपक्रम राबवला.”
प्रसाद कुलकर्णी यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “वाढदिवसाचे औचित्य साधून वाचनसंस्कृतीला चालना देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रविराज पाटील यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे. यामुळे तरुण पिढीसमोर एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.”
Advt
या कार्यक्रमात शशांक बावचकर आणि प्रा. रोहित शिंगे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच प्रविण आलासे, नंदकिशोर जोशी, रवींद्र पाटील, अनिल पचिंद्रे, सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी, कविता डांगरे आदी मान्यवर उपस्थित होते. आभार पांडुरंग पिसे यांनी मानले.
शशांक बावचकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रबोधन वाचनालयास पुस्तके भेट देताना रविराज पाटील
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







