ICHMH51NEWS.IN
9921600800

गणराया अवॉर्ड वितरण सोहळा आज; ध्वनीप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर खटले दाखल होणार का?

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गणराया अवॉर्ड वितरण सोहळा आज; ध्वनीप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर खटले दाखल होणार का?

इचलकरंजी:

पोलिसांनी गणेशोत्सव काळात मर्यादित आवाजात डॉल्बी वाजवण्यास परवानगी दिली होती. मात्र शहरातील शंभरपेक्षा जास्त मंडळांनी ठरवलेल्या मर्यादांचा भंग करून ध्वनीप्रदूषणाचा अतिरेक केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या आवाहनाला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही, ही बाब विशेष लक्षवेधी ठरली आहे.

पोलिसांनी आवाजाचे रिडिंग घेऊन माहिती संकलित केली असून, आगमन मिरवणुकीत मर्यादा उल्लंघन करणाऱ्यावर प्राथमिक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.विसर्जन मिरवणुकीत अनेक मंडळांनी नियम मोडले व ध्वनिप्रदूषणाचा अतिरेक झाला त्यानंतर पोलीस दलाने रिडींग तर घेतले आता पोलीस दल वेळेत कारवाई करणार का आणि मंडळांनी केलेले खुलासे निवडणुकीच्या पर्शवभूमीवर मान्य होणार का आणि खरोखरच नियम मोडणाऱ्या मंडळांवर खटले दाखल होतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आज होणाऱ्या गणराया अवॉर्ड वितरण सोहळ्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचा सत्कार होणार आहे. पण याचसोबत, नियम मोडणाऱ्यांवर राजकीय दबाव झुगारून कारवाई करण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून मत व्यक्त होत आहे.

यावर्षी इचलकरंजीत ध्वनीप्रदूषणाचा अतिरेक झाल्याची चर्चा असून, याबाबत पोलिसांची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

सामाजिक संस्थांचे प्रयत्न

इचलकरंजीत मेडिकल असोसिएशन,एनजीओ फौंडेशन,इचलकरंजी नागरिक मंच,माय फौंडेशन,रोटरी क्लब यांनी डॉल्बी व लेसर बाबतीत धाडसाने जनजागृती केली,निवेदने दिली याबाबत आता प्रशासनाने ठोस भूमिका घेतल्यास डॉल्बीचा आवाज भविष्यात मर्यदित राहील

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा