ICHMH51NEWS.IN
9921600800

गणेशोत्सव काळात हद्दपार आरोपींवर पोलिसांची धडक कारवाई

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गणेशोत्सव काळात हद्दपार आरोपींवर पोलिसांची धडक कारवाई.

इचलकरंजी:

इचलकरंजी हद्दीत तिन्ही पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत जवळपास १९६ जणांना गणेशोत्सव काळात हद्दपार करण्यात आले होते तर इतर बरेच जण आधीच हद्दपार आहेत.

गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहर व परिसरातील पोलिसांनी विशेष नाकाबंदी व कोबींग ऑपरेशन राबवून हद्दपार आरोपींवर कडक कारवाई केली.

इचलकरंजी पोलीस ठाणे हद्दीत पवन सुरेश गवळी, समरजीत शिवाजी पाटील, संजय बापू तारदाळे, ओमकार श्रीपती ढमणगे, जावेद मोहम्मद शरीफ पठाण व अर्जुन लक्ष्मण भोसले या आरोपींवर कारवाई करण्यात आली.

शहापूर पोलीस ठाणे हद्दीत बाळु उर्फ युवराज शिवाजी पाताडे व अल्ताफ मिरासो शेख यांच्यावर कारवाई झाली.

शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत राज उर्फ चिन्या संजय सुर्यवंशी, हनुमंत अनिल दिंडे, आरवाज महंमदहाफीज शेख, रोहन सुरेश गेजगे, शाहरुख जावेद जमादार, स्वप्नील संतोष फातले, आकाश आण्णाप्पा भीलगुडे व विपुल आप्पासो नाईक या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

गणेशोत्सव काळात पोलिसांची ही कारवाई गुन्हेगारांवर चाप बसवणारी ठरली असून, नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा