ICHMH51NEWS.IN
9921600800

अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसची श्रद्धांजली

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसची श्रद्धांजली

इचलकरंजी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जनमानसांचे धडाडीचे लोकनेते अजितदादा पवार यांचे आज सकाळी बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत आकस्मिक अपघाती निधन झाले. या दुःखद घटनेने संपूर्ण महाराष्ट्रासह राजकीय वातावरणात शोकाची लाट पसरली आहे. अजितदादा हे लाखो-करोडो कार्यकर्त्यांचे ‘दादा’ होते – लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, शेतकऱ्यांचा आधार, विकासाचे प्रतीक होते.
या दुःखद प्रसंगी इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने भोनेमाळ येथील हॉलमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली व शोकसभा आयोजित करण्यात आली होती. सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, इस्माईल समडोळे, तौफिक मुजावर, बळीराम आबा घायतीडक, भारत डोईफोडे, सौ. शबाना समडोळे, शहनाज हडळगे, नरसिंह महाजन, दिलावर पटेल, सिकंदर मुल्ला, पुष्पा कुचेकर, अमीर मुल्ला, इलियास समडोळे, अतिक समडोळे, रेहान समडोळे, रमजान बागशाही, सुप्रिया पोवार, अमृता शंभूशेट्टी आदी मान्यवरांनी अजितदादांच्या कार्याचा गौरव करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी अनेकांना अश्रू अनावर होऊन त्यांनी दादांच्या स्मृतींना उजाळा दिला. अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचे स्तंभ होते. त्यांनी सहा वेळा उपमुख्यमंत्री व विक्रमी अर्थमंत्रीपदासह अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. त्यांच्या अकाली निधनाने पक्ष आणि राज्याला न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपली सामुदायिक भावना व्यक्त करताना या दुःखद प्रसंगी अजितदादांच्या कुटुंबीय, नातेवाईक आणि लाखो चाहत्यांसोबत शोक व्यक्त करत  त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे व त्यांच्या आत्म्याला चीरशांती मिळावी आणि त्यांच्या कार्याचा वारसा कायम पाठीशी राहावा यासाठी प्रार्थना केली.

स्व.अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा